Premala Upma Nahi

मी कशी ओळखू प्रीती,
मी कशी ओळखू प्रीती
हे हृदय म्हणू की लेणे
हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिऊनी ओले
थेंबांचे मोती झाले
हिरवेपण पिऊनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू
मी कशी फुलोरा शोधू
हे फुल म्हणू की पाने
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू
मी कशी ओळखू जादू
हे परिस म्हणू की सोने
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

का नकळत डोळे मिटती
स्पर्शांत शहारे उठती
का नकळत डोळे मिटती
स्पर्शांत शहारे उठती
मी कशी भावना बोलू
मी कशी भावना बोलू
हे शब्द म्हणू की गाणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
मी कशी ओळखू प्रीती
हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे

Beliebteste Lieder von Anuradha Paudwal

Andere Künstler von Film score