Utha Panduranga Aata
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां
संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा
सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा
रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी
मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया
सेजें हालउनि जागे करा देवराया
गरुड हनुमंत पुढे पाहती वाट
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा
विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां