Aaie He Devache

Yeshwant Deo

प्रेम देण्यासाठी आई निर्मिली
आई हे देवाचे रूप
सर्वांठायी देव धावेल कसा
देवाला कामे हि खूप
प्रेम देण्यासाठी आई निर्मिली
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप

तुझ्या दर्शना आतुर झाले
माझ्या डोळ्यांतील पाणी
कोण सावरील कोण शिकविल
आई तुझ्यावाचुनी
आई तुझ्यावाचुनी
धन्य तो झाला, मिळाली ज्याला
आईची माया अमाप
प्रेम देण्यासाठी आई निर्मिली
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप

वैरी भासते नकोशी होते
आई तिच्या लेकीला
माझी समाधी मीच पहाते
देवाची कठोर लीला
देवाची कठोर लीला
मातृपदाचे भूषण की हा
जाळता भीषण शाप
प्रेम देण्यासाठी आई निर्मिली
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप

आई म्हणोनी बोलाविताना
प्रकाश भरेल व्योमी
आई आई
आई म्हणोनी बोलाविताना
प्रकाश भरेल व्योमी
प्राणपक्षी हा माघारी येईल
मरण ओलांडुनी आई
मातरी दैवा साहीन मी हा
जन्मभरीचा विलाप
प्रेम देण्यासाठी आई निर्मिली
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप
आई हे देवाचे रूप

Wissenswertes über das Lied Aaie He Devache von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Aaie He Devache” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Aaie He Devache” von Lata Mangeshkar wurde von Yeshwant Deo komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score