अनामिकास अनामवीरा

KUSUMAGRAJ, VASANT PRABHU

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात
अनाम वीरा

धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाणी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी
अनाम वीरा

मूकपणाने तमी लोपती संध्येच्यारेषा
मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा
अनाम वीरा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
अनाम वीरा

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
अनाम वीरा

काळोखातुनि विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा
अनाम वीरा

Wissenswertes über das Lied अनामिकास अनामवीरा von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “अनामिकास अनामवीरा” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “अनामिकास अनामवीरा” von Lata Mangeshkar wurde von KUSUMAGRAJ, VASANT PRABHU komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score