Chandanyat Ya Dharni Hasate
चांदण्यात ह्या धरणी हसते चंद्र हसे गगनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदण्यात ह्या धरणी हसते चंद्र हसे गगनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
आभाळाची धरणीवरती
आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती
अशीच आहे अखंड प्रीती
आ आ आ आ
त्या प्रीतिच्या शीतलतेने सुखावली रजनी
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं
ओली वाळू झाली रुपेरी
ओली वाळू झाली रुपेरी
नाच नाचती सागर लहरी सागर लहरी
नाच नाचती सागर लहरी
आ आ आ आ
माडांमधुनी लबाड वारा आळवितो गाणी
चांदणे फुलले माझ्या मनीं
चांदणे फुलले माझ्या मनीं