Hale Jhulat Dule
हले झुलत डुले पाळणा
हले झुलत डुले पाळणा
प्राणफुला झोपी जा ना
प्राणफुला झोपी जा
जो जो रे
जो जो रे
जो जो रे ए ए ए
प्राणफुला झोपी जा ना
प्राणफुला झोपी जा
हले झुलत डुले पाळणा
निजला गंध वारा
झोपला नभी तारा
पेंगुळला पानांवरी कळ्या-फुलांचा तुरा
प्राणफुला झोपी जा
हले झुलत डुले पाळणा
पुनवा रात बोले
मीट तू बाळा डोळे
झोका देते रे
नीज लाडक्या- चिमण्या छकुल्या राजिवा आ आ आ
प्राणफुला झोपी जा
हले झुलत डुले पाळणा
पाळणा मंद होतो
आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला
प्राणफुला झोपी जा ना
प्राणफुला झोपी जा
हले झुलत डुले पाळणा