Jai Dev Jai Dev Jai Jai Shivarya
जय देव जय देव जय जय शिवराया
जय देव जय देव जय जय शिवराया
जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
जय देव जय देव जय जय शिवराया
जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
जय देव जय देव जय जय शिवराया
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला
म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
हो शिवभूपाला
सद्र्दिता भूमाता दे तुज हांकेला
दे तुज हांकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां
म्लेंच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जयदेव जयदेव जय जय शिवराया
जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
जयदेव जयदेव जय जय शिवराया
आणि भीमा शंकराच्या जठात आणि नाहीर घटाच्या ओठात
वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उशाक्काल झाला
शिवरायांचा जन्म झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला
पुत्र शहाजी राजांना झाला
पुत्र सह्याद्रीला झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला
पुत्र भारत वर्षाला झाला
शिवनेरीवर शिवबांचा पाळणा अंदालु लागला
महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखांनी अंगाई गीत गाऊ लागली