Kala Jya Lagalya Jeeva

Vasant Prabhu, B R Tambe

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचें कुणाला काय सांगाव्या
कळा ज्या लागल्या जीवा

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई
समुद्री चौंकडे पाणी पिण्याला थेंबही नाही
जनांच्या कोरड्या गप्पा असे सारे जगद्ंधू
हमामा गर्जनेचा हो न नेत्रीं एकही बिंदू
कळा ज्या लागल्या जीवा

नदीला पूर हा लोटे न सेतू ना कुठे नावा
नदीला पूर हा लोटे न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे धडाडे चौंकडे दावा
नदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानीं
इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी
कळा ज्या लागल्या जीवा

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे
तटातट काळजाचे हे तुटाया लागती धागे
पुढे जाऊं वळूं मागे करूं मी काय रे देवा
खडे मारी कुणी कोणी हसे कोणी करी हेवा
कळा ज्या लागल्या जीवा

Wissenswertes über das Lied Kala Jya Lagalya Jeeva von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Kala Jya Lagalya Jeeva” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Kala Jya Lagalya Jeeva” von Lata Mangeshkar wurde von Vasant Prabhu, B R Tambe komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score