Prem Tujyavar Karte Mee Re

P SAVLARAM, VASANT PRABHU

प्रेम तुझ्यावर करिते मी रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे
सांगितल्याविण ओळख तू रे
सांगितल्याविण ओळख तू रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे

चंद्र झळकता
तुझिया नयनीं
या डोळ्यांतील
प्रीत-रोहिणी
चंद्र झळकता
तुझिया नयनीं
या डोळ्यांतील
प्रीत-रोहिणी
ओढुन किंचित निळी ओढणी
ओढुन किंचित निळी ओढणी
हासत खुदुखुदु लाजत का रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे
पल्लवतो बघ तनुलतिकेवर
स्पर्श सुखाचा तो गुलमोहर
पल्लवतो बघ तनुलतिकेवर
स्पर्श सुखाचा तो गुलमोहर
चैत्रप्रीतिच्या आम्रतरुवर
चैत्रप्रीतिच्या आम्रतरुवर
बोलत कुहुकुहु कोकिळ का रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे

तुझ्या दिशेला वळता मोहुन
सूर्यफुलापरी फुलते यौवन
तुझ्या दिशेला वळता मोहुन
सूर्यफुलापरी फुलते यौवन
भ्रमर मनाचा हृदयी रंगुन
भ्रमर मनाचा हृदयी रंगुन
गुंजत हितगुज तुझेच का रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे
सांगितल्याविण ओळख तू रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे

Wissenswertes über das Lied Prem Tujyavar Karte Mee Re von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Prem Tujyavar Karte Mee Re” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Prem Tujyavar Karte Mee Re” von Lata Mangeshkar wurde von P SAVLARAM, VASANT PRABHU komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score