Rama Haridayi Ram Naahin
रामा हृदयी राम नाही
रामा हृदयी राम नाही
पतिव्रते चारुते सीते का रडसी धायी धायी
रामा हृदयी राम नाही
राहिलीस तू रावण सदनी
शंकित होता ती जनवाणी
राहिलीस तू रावण सदनी
शंकित होता ती जनवाणी
त्यजिता तुजला याच कारणी
सवर्साक्षी सवर्ज्ञानी राम तुझा तो उरला नाही
रामा हृदयी राम नाही
पावित्र्याला कलंक लावून
पतितची झाला पतितपावन
पावित्र्याला कलंक लावून
पतितची झाला पतितपावन
करण्या पावन श्रीरघुनंदन
पतिव्रते गं लाव पणाला शतजन्मांची तव पुण्याई
रामा हृदयी राम नाही
लोकाग्रणी त्या रामाहृदयी
जनतारूपी तूच सीता
लोकाग्रणी त्या रामाहृदयी
जनतारूपी तूच सीता
तुला कलंकित तूच म्हणता
व्याकुळ झाला तव हृदयीचा करूणाकर प्रभू रामचंद ही
रामा हृदयी राम नाही
रामा हृदयी राम नाही