Sandhikali Ya Asha

Gangadhar Mahambare

संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा
चांद येई अंबरी
चांदराती रम्य या संगती सखी प्रिया
चांदराती रम्य या संगती सखी प्रिया
प्रीत होई बावरी
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा

मुग्ध तू नि मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी
अबोल गोड संभ्रमी एकरूप संगमी
रातराणीच्यामुळे रातराणीच्यामुळे
श्वास धुंद परिमळे
फुलत प्रीतीची फुले
फुलत प्रीतीची फुले
प्रणयगीत हे असे कानी ऐकू येतसे
गीती शब्द ना जरी
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा

सांजरंगी रंगुनी नकळताच दंगुनी
नकळताच दंगुनी हृदयतार छेडुनी
युगुलगीत गाउनी युगुलगीत गाउनी एकरूप होउनी
देऊ प्रीत दावुनी देऊ प्रीत दावुनी
प्रणयचित्र हे दिसे रंगसंगती ठसे
कुंचला नसे जरी
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा
धुंदल्या दिशा दिशा

Wissenswertes über das Lied Sandhikali Ya Asha von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Sandhikali Ya Asha” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Sandhikali Ya Asha” von Lata Mangeshkar wurde von Gangadhar Mahambare komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score