Sansar Ha Sukhacha
संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते मी अमृतात न्हाते

माझ्या मनात कोणी
कोणी अंगाई गीत गाते

तू देवरूप माझे मी एकरूप झाले
हिंदोळते उरी मी मन मोहरून आले
तू देवरूप माझे मी एकरूप झाले
हिंदोळते उरी मी मन मोहरून आले
वात्सल्य आणि प्रीती प्रीती
वात्सल्य आणि प्रीती जुळले नवीन नाते
संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते मी अमृतात न्हाते
या भावरम्य लाटा हा सागरी किनारा
या भावरम्य लाटा हा सागरी किनारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
मज वेगळेपणाचे वेगळेपणाचे
मज वेगळेपणाचे अपरूप आज वाटे