Sur Amhi Chorito Ka

Aarati Prabhu

आ आ आ आ आ आ
ही निकामी आढ्यता कां
ही निकामी आढ्यता कां
दाद द्या अन् शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
ही निकामी आढ्यता कां
दाद द्या अन् शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
मैफिलीची साथ आम्हां दैवयोगें लाभली
मैफिलीची साथ आम्हां दैवयोगें लाभली
न्या तुम्ही गाणें घराला
फूल किंवा पाकळी

न्या तुम्ही गाणें घराला
फूल किंवा पाकळी
दाद देणें हेंहि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणें गजरे दंवाचे
आणि वायुचे घट
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
ही निकामी आढ्यता कां

नम्र व्हा अन् सूर जाणा जीवघेणा रंग हा
नम्र व्हा अन् सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयू हो करावा संग हा
साजरा उधळून आयू हो करावा संग हा
चांदणें पाण्यांतलें की वेचितां येईलही

आणि काळोखांत पारा ये धरूं चिमटींतही
ना परंतू सूर कोणा लावितां ये दीपसा
सूर नोहे तीर कंठीं लागलेला शापसा
सूर नोहे तीर कंठीं लागलेला शापसा
सूर नोहे तीर कंठीं
लागलेला शापसा
सूर नोहे तीर कंठीं
लागलेला शापसा
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
ही निकामी आढ्यता कां
दाद द्या अन् शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरितों कां
चोरिता कां वाहवा
ही निकामी आढ्यता कां

Wissenswertes über das Lied Sur Amhi Chorito Ka von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Sur Amhi Chorito Ka” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Sur Amhi Chorito Ka” von Lata Mangeshkar wurde von Aarati Prabhu komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score