Zulato Bai Ras Zula

Hridaynath Mangeshkar, Sudhir Moghe

झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी कान्हाही निळा
झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला

वार्याची वेणू फांद्यांच्या टिपर्या
वार्याची वेणू फांद्यांच्या टिपर्या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
वार्याची वेणू फांद्यांच्या टिपर्या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा
झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला

प्राणहीन भासे रासाचा रंग
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा
झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला

गुंतलास कोठे नंद नंदना तू
गुंतलास कोठे नंद नंदना तू
राधेच्या रमणा केव्हा येशील तू
गुंतलास कोठे नंद नंदना तू
राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट झरे रात सरे ऋतू चालला
झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी कान्हाही निळा
झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला

Wissenswertes über das Lied Zulato Bai Ras Zula von Lata Mangeshkar

Wer hat das Lied “Zulato Bai Ras Zula” von Lata Mangeshkar komponiert?
Das Lied “Zulato Bai Ras Zula” von Lata Mangeshkar wurde von Hridaynath Mangeshkar, Sudhir Moghe komponiert.

Beliebteste Lieder von Lata Mangeshkar

Andere Künstler von Film score