Ha Chhand Jivala Lavi Pise
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसें
हा छंद जिवाला लावि पिसें
हा छंद जिवाला लावि पिसें
ती वीज तुझ्या नजरेमधली
गालीं खुलते रंगेल खळी ई ई
ओठांत रसेली जादुगिरी
उरिं हसति गुलाबी गेंद कसे
हा छंद जिवाला लावि पिसें
हा छंद जिवाला लावि पिसें
नखर्यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी ई ई
हा झोक तुझा घायाळ करी
हाये हाये
कैफांत बुडाले भान असे
हा छंद जिवाला लावि पिसें
हा छंद जिवाला लावि पिसें
ती धुंद मिठी बेबंद नशा आ आ आ
श्वासांत सखे विरतात दिशा आ आ आ
बेहोश सुखाच्या या गगनीं
मी आज मला हरवून बसे
हा छंद जिवाला लावि पिसें
हा छंद जिवाला लावि पिसें