Ha Rusava Sod

SHRIKANT THAKARE, VANDANA VITANKAR

ये अगं
हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा
सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा
सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
बनलो निशाना सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा
सोड ना अबोला

इष्काची दौलत उधळि तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा अलबेला नशिला
करि मदहोश मला नुरले भान आता
जाहला जीव खुळा नुरले भान आता
जाहला जीव खुळा
पुरे हा बहाणा सोड ना अबोला

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुष्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा फुले अंगार असा
सावरू तोल कसा नको छळवाद आता
झालो कुरबान तुला नको छळवाद आता
झालो कुरबान तुला
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा
सोड ना अबोला
सोड ना अबोला
ए सोड ना अबोला

Wissenswertes über das Lied Ha Rusava Sod von Mohammed Rafi

Wer hat das Lied “Ha Rusava Sod” von Mohammed Rafi komponiert?
Das Lied “Ha Rusava Sod” von Mohammed Rafi wurde von SHRIKANT THAKARE, VANDANA VITANKAR komponiert.

Beliebteste Lieder von Mohammed Rafi

Andere Künstler von Religious