Aaji Mahanati
साळू माझी सोन परी
आजी म्हणती
कशी रुजली तुळस बाई
भांगेच्या पोटी
सुंदर सालस आणि ठेगनी की म्हणत्यात ती
साखरवानी हसती ग्वाड
आजी म्हणती
करवंदासारख काळ काळ केस दीड हाती
कापसावाणी गोरी सगुणा केतकीची पाती
रांधायला सुगरण पोर पोटदेव भरती
हाय कोणाच्या र नशिबात आजी म्हणती
बापे डुपे नाचती तिच्या अवती भोवती
गावच्या साऱ्या बाया वाहिन्या बोटं मोडती
मुरडत ठुमकत साळू जवा चालती
कवळी गवळी चिंच जणू आजी म्हणती
लाल भय कुंकू भाळी मिरविती
ग्वाड गुलाबी हसून गाली जिरवती
काळी हि नागीण काळीज चोरटी
हाय कोणाच्या र नशिबात आजी म्हणती
साळू माझी सोन परी
आजी म्हणती
कशी रुजली तुळस बाई
भांगेच्या पोटी
सुंदर सालस आणि ठेगनी की म्हणत्यात ती
साखरवानी हसती ग्वाड
आजी म्हणती
आजी म्हणती