Kalya Ramacha Darwaja

VAMAN KARDAK, HARSHAD SHINDE

हो हो
हो हो
हं हं
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

हो हो
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही

हो कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आघाडीवर होता जरी नऊकोटीचा राजा
आघाडीवर होता जरी नऊकोटीचा राजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

हो हो
हो हो
हं हं
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाचीच वाणी

माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाचीच वाणी
निनादत होती सारी भीमाचीच वाणी
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

हो हो
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चौथा मेळा आला तुझ्या धामा

दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चौथा मेळा आला तुझ्या धामा
पंढरीचा चौथा मेळा आला तुझ्या धामा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

हो हो
हो हो
हं हं
सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा
काठ्यांचा मार खाणार होता आमचा दादा

सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा
काठ्यांचा मार खाणारा होता आमचा दादा
काठ्यांचा मार खाणारा होता आमचा दादा
जयघोष जय भीमाचा झाला गाजावाजा
जयघोष जय भीमाचा झाला गाजावाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

हो हो
राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे
वामनला त्याची थोडी चवे चाखवा रे

हो राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे
वामनला त्याची थोडी चवे चाखवा रे
वामनला त्याची थोडी चवे चाखवा रे
बोलले पुजारी आता धेडग्यांनो जा जा
बोलले पुजारी आता धेडग्यांनो जा जा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला जरी
लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

Wissenswertes über das Lied Kalya Ramacha Darwaja von आदर्श शिंदे

Wer hat das Lied “Kalya Ramacha Darwaja” von आदर्श शिंदे komponiert?
Das Lied “Kalya Ramacha Darwaja” von आदर्श शिंदे wurde von VAMAN KARDAK, HARSHAD SHINDE komponiert.

Beliebteste Lieder von आदर्श शिंदे

Andere Künstler von Film score